नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सुरभी कॉर्नरला दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना; महामार्गावर चिखलाचे साम्राज्य – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

सुरभी कॉर्नरला दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना; महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी;

अहिल्या महामार्गावरील सुरभी कॉर्नरला चिखलमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या या मार्गावरून जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे. महाराष्ट्र बँकेसमोर मंगळवार, (दि.२५) रोजी सकाळच्या सुमारास एक दुचाकीस्वार घसरून पडल्याने किरकोळ दुखापतीची घटना घडली असून स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भावडी–लोणीकंद परिसरात सुरु असलेल्या दगडखाण, क्रशर आणि गौण खनिज व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात क्रसंड, खडी, दगडाची वाळू इत्यादी खनिज मालाची वाहतूक डंपरद्वारे शहराकडे होते. हे डंपर जेव्हा खाण रस्त्यावरून महामार्गावर येतात, तेव्हा सुरभी कॉर्नरपासून लोणीकंदपर्यंत गाड्यांमधील माल रस्त्यावर सांडतो. त्यातून धुळीचे साम्राज्य निर्माण होते.

खाण संघटनेकडून धूळ कमी करण्यासाठी रस्त्यावर ट्रॅक्टरने साफसफाई करून पाणी मारले जाते; मात्र त्यामुळे रस्ता चिखलमय होऊन धोकादायक बनतो. परिणामी दुचाकीस्वार चिखलावर घसरून अपघातग्रस्त होत आहेत. सुरभी कॉर्नरला अशा अनेक अपघातांच्या घटना वाढल्या असून प्रशासन व खाण व्यवसायिकांकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांची आहे.

महामार्गावरून धावणाऱ्या डंपरमधील कोरडा माल उडतो. अनेक डंपर चालक ताडपत्री न बांधता गाड्या चालवतात, ज्यामुळे धूळ थेट मागील वाहनचालकांच्या डोळ्यांत जाते आणि अपघाताचा धोका वाढतो. रात्रीच्या वेळी काही चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपर चालवतात, गतीमर्यादा पाळली जात नाही अशी गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.

धुळप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून श्वसनाच्या तक्रारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बेजबाबदार डंपर चालकांवर आणि खनिज वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.महामार्ग संवर्धन, वाहतूक विभाग आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून रस्ता सुरक्षित करावा,अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

 

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031