नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , डंपरमध्ये धोकादायक दगड वाहतूक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

डंपरमध्ये धोकादायक दगड वाहतूक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी

भावडी–लोणीकंद परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात दगडखाणी, क्रशर व गौण खनिज व्यवसाय सुरू असून, यामुळे क्रशरमधून निघणारा क्रशंड, खडी, दगडाची वाळू आदी खनिज मालाची मोठ्या संख्येने डंपरद्वारे वाहतूक केली जाते. मात्र या वाहतुकीचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून रस्त्यावरून धावणारे हे अवजड डंपर अक्षरशः जीवघेणे ठरत आहेत.

स्थानिकांच्या मते, डंपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त खनिज भरले जाणे, चालकांचा अतिवेग, तसेच पोलीस व प्रशासनाकडून होणारे उघड दुर्लक्ष यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यावरून उडणारी दगडांची धूळ, सर्रास उघडे पडणारे दगड आणि बेफिकीरपणे धावणारे डंपर यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर सतत गदा येत आहे.

“हा जीवाशी चाललेला खेळ नेमका कधी थांबणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, या धोकादायक वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणावेत, नियमित तपासणी मोहीम राबवावी आणि अतिवजनी डंपरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीची पावले उचलली नाहीत, तर कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो, अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930