नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे जिल्ह्यातील खाणपट्टाधारकांची १० डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पुणे जिल्ह्यातील खाणपट्टाधारकांची १० डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक आणि क्रशर उद्योजकांच्या अडचणी, समस्या आणि नियमनासंबंधी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृह (५ वा मजला), बविंग, पुणे-१ येथे होणार आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व खाणपट्टाधारकांनी आणि क्रशर उद्योजकांनी स्वतः उपस्थित राहून चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, तसेच संबंधित तहसीलदार उपस्थित राहणार असून आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसाधारण शाखेला कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील वाढत्या खाणीच्या कामकाजावर नियंत्रण, पर्यावरणीय परिणाम, सुरक्षा नियम, आणि उद्योजकांच्या अडचणी यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930