नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , फुलगाव येथे मॉडर्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

फुलगाव येथे मॉडर्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी 

फुलगाव, (ता. हवेली) मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे-०५ (कनिष्ठ महाविद्यालय +२स्तर) यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे १ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत फुलगाव येथे सात दिवसीय हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फुलगावचे प्रशासक एस. आर. मोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर यांनी भूषविले.

यावेळी माजी उपसरपंच राहुल वागस्कर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माजी सरपंच कांताराम वागस्कर, शंकर वागस्कर, सोमनाथ वागस्कर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विठ्ठल देवढे, डॉ. वैशाली आहेर, समिती सदस्य, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरादरम्यान स्वयंसेवक विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अध्यात्म व विज्ञान या विषयावर सुनील वागस्कर यांचे मार्गदर्शन युवाप्रेरणा – स्वामी विवेकानंद या विषयावर डॉ. नरेंद्र नायडू यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर योगेश ठिपसे यांचे व्याख्यान व्यक्तीमत्त्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका या विषयावर विजय अंधारे यांचे मार्गदर्शन

याशिवाय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, श्रमदान, दत्तमंदिर परिसर, पालखी मार्ग व महादेव घाट स्वच्छता, ग्रामपंचायत भेट, शासकीय योजनांचा अभ्यास, ग्रामस्थांशी संवाद, भविष्यकालीन विकास योजनांवर चर्चा अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला.शिबिराच्या शेवटच्या दिवशी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती आणि देशभक्तीचे सुंदर प्रदर्शन घडवले.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व समाजाप्रति असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप खंडाळे, फुलगावच्या माजी सरपंच मंदाकिनी साकोरे, माजी उपसरपंच राहुल वागस्कर यांनीही विद्यार्थ्यांना मनोगत व मार्गदर्शनपर शब्दांनी प्रेरित केले.

या कार्यक्रमाला माजी सरपंच कांताराम वागस्कर, माजी सरपंच सुनील वागस्कर, भानुदास वागस्कर, मुलींच्या सैनिकी शाळेचे व्यवस्थापक अर्जुन शिंदे, विठ्ठल देवढे, डॉ. वैशाली आहेर, समिती सदस्य, स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

उत्कृष्ट स्वयंसेवकांचा गौरव प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शिबिरातील अनुभव सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल देवढे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. वैशाली आहेर यांनी केले.फुलगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे सात दिवसीय (एनएसएस) शिबिर यशस्वीपणे पार पडले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930