नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

बृहन्मुंबईसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून गुरुवार, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. यावेळी आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहूनच सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून उर्वरित २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील.सर्व महानगरपालिकांसाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930