नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मान्यवरांच्या उपस्थितीत ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील पेरणे, वढू व फुलगाव परिसरातील माता-भगिनींसाठी लोणीकंद गावचे माजी उपसरपंच योगेशभाऊ झुरुंगे मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित भव्यदिव्य ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा’ (होम मिनिस्टर) हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पेरणे फाटा येथील सॅफरॉन बँक्वेट हॉल, आमदार नगर येथे हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे, संतोष कापरे, सोसायटीचे संचालक किसन टुले, सामाजिक कार्यकर्ते संजय वाळके, बालाजी रास्ते, डॉ. शिवांजली वाळके, आदर्श सरपंच अनिल होले, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन रघुनाथ तापकीर, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर झुरुंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सादरीकरण महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार विजेत्या प्रतिभा पाटील यांनी केले. महिलांचा सहभाग वाढवून परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात ५०० हून अधिक महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा पाच फेऱ्यांमध्ये पार पडली. सेमीफायनलमध्ये २५, तर फायनलमध्ये १२ महिला स्पर्धक पोहोचल्या. फायनलमध्ये निवड झालेल्या १२ महिलांपैकी ११ महिलांना मुख्य बक्षिसे, तर एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सर्व १२ जणींना पैठणी साडी प्रदान करून नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लोणीकंदचे माजी उपसरपंच सुधीर कंद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेलचे अध्यक्ष जयेश कंद, माजी व्हाइस चेअरमन भाऊसाहेब झुरुंगे, युवा उद्योजक आकाश राजपूत, राजेंद्र वायकर, गणेश पोटफोडे, भाऊसाहेब ठोंबरे, भीमा ठोंबरे, जयसिंग ठोंबरे, नाना देवकर, सामाजिक कार्यकर्ते कैलास झुरुंगे, कुंडलिक झुरुंगे, संजय गिरमे, उत्तम झुरुंगे, गणेश झुरुंगे, संदीप झुरुंगे, दीपक झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, रोहित झुरुंगे, चेतन झुरुंगे, अभिषेक झुरुंगे, आकाश झुरुंगे, राजू वाघोले, हर्ष वानखेडे, संग्राम विधाटे, शंतन वाडेकर, बाबुभाई बोरकर, फिरोजभाई शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर झुरुंगे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत लोणीकंदच्या माजी सरपंच प्रियांका झुरुंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेशभाऊ झुरुंगे मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930