नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२ कडून घरफोडीचा गुन्हा उघड, एक आरोपी ताब्यात; ५ लाख ९० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२ कडून घरफोडीचा गुन्हा उघड, एक आरोपी ताब्यात; ५ लाख ९० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाघोली पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केला असून या प्रकरणात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीकडून सुमारे ५ लाख ९० हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२१/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३३१(३) व ३३१(४) अन्वये दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२ च्या अधिकारी व अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मनिष मुर्ती पुजारी (वय ३४ वर्षे, रा. सर्व्हे नं. १०८/१०९, ताकवणे हॉस्पिटल शेजारी, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून ५०.३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चैन, कर्णफुले, मणी तसेच १८० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पट्ट्या व तोडे असा एकूण रु. ५,९०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख,उपपोलीस आयुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे तसेच पोलीस अंमलदार राजू पुणेकर, संदीप येळे, प्रफुल्ल मोरे, विक्रांत सासवडकर व विनायक येवले यांनी केली आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930