नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदीप कंद यांच्या प्रचाराचा शुभारंभ – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदीप कंद यांच्या प्रचाराचा शुभारंभ

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वडगाव शिंदे–काकडे येथे ग्रामदैवत नागेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन ‘प्रचाराचा नारळ’ फोडला

लोणीकंद / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार आणि शिरूर हवेली चे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील वडगाव शिंदे – काकडे या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रदीप वसंतराव कंद आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या उमेदवार लोचन शिवले यांच्या निवडणूक प्रचाराचा रविवार (दि.१८) रोजी औपचारिक शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत वडगाव शिंदे–काकडे येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराजांचे दर्शन व पूजन करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यावेळी प्रदीप कंद यांनी ग्रामदैवतास साकडे घालून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली. धार्मिक वातावरणात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या शुभारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते…

 

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कंद यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, शेतकरी प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर भर देत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, आजी–माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी “प्रदीप कंद यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा” निर्धार व्यक्त केला.

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात यंदा निवडणूक चुरशीची होणार असून, प्रदीप कंद यांनी प्रचाराची सुरुवात धार्मिक श्रद्धा, लोकसंपर्क आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर केल्याने आगामी निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार अधिक गतिमान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930