नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद–पेरणे गटात तिरंगी लढत; शिवसेनेचे योगेश झुरुंगे प्रचारात आघाडीवर – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद–पेरणे गटात तिरंगी लढत; शिवसेनेचे योगेश झुरुंगे प्रचारात आघाडीवर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद–पेरणे गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून हा गट आता स्पष्टपणे तिरंगी लढतीकडे वळला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार मैदानात उतरल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना (शिंदे गट)कडून योगेश झुरुंगे यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निर्णयामुळे प्रस्थापित उमेदवारांसमोर नवे आव्हान उभे राहिले असून मतदारांची भूमिका बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर झुरुंगे यांच्या प्रचाराला मोठा वेग मिळाला असून गावागावात संपर्क दौरे, बैठका व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर या घडामोडींचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

या गटातील प्रमुख लढत शिवसेना (शिंदे गट)चे योगेश झुरुंगे, भाजपचे किरण साकोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप कंद यांच्यात रंगणार आहे. कोणाची रणनीती यशस्वी ठरणार आणि अंतिम विजय कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930