नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात प्रचाराला वेग; भाजप, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेनेही कंबर कसली – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात प्रचाराला वेग; भाजप, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेनेही कंबर कसली

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
  • लोणीकंद, प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, मंगळवार (दि. २७) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शिल्लक असतानाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनेनेही प्रचारात कंबर कसली आहे. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याने या गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या गटात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा प्रभाव असल्याने या दोन्ही पक्षांचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र शिवसेनेने थेट आव्हान देत प्रचारात आक्रमक भूमिका घेतल्याने पेरणे–लोणीकंद गटात तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या गटात सुरुवातीला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत अपेक्षित होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली असून, निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी रोजी होती. जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप वसंत कंद तर भाजपकडून किरण संपत साकोरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. भाजपकडून पंचायत समितीची उमेदवारी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.

दरम्यान, कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले व कोणत्याही दबावाला न झुकता योगेश बाजीराव झुरुंगे यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवत थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. प्रस्थापित उमेदवारांपुढे शिवसेनेचा उमेदवार उभा ठाकल्याने राजकीय गणिते बदलली आहेत, अशी चर्चा नागरिक करत आहे.

२७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी आधीच प्रचाराचा नारळ फोडत घरोघरी भेटी, सभा, संवाद मेळावे व बैठकींच्या माध्यमातून प्रचाराला वेग दिला आहे.

सर्वच उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात असून, विकासकामांचे व्हिजन मांडणाऱ्या व्हिडिओ रील्स, फोटो व प्रचार साहित्य इंस्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसारित केले जात आहे. यामुळे तरुण मतदारांसह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे.५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, प्रचारासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने उमेदवार व कार्यकर्ते गावोगावी फिरून मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930