नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

७ जिल्हा परिषद गटांत २० तर १४ पंचायत समिती गणांत ४६ उमेदवार रिंगणात..

शिरूर | प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात माघारी झाल्या असून निवडणूक चित्र आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ७ गटांतून एकूण २० उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४ गणांतून ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या ७ गटांतून तब्बल २९ तर पंचायत समितीच्या १४ गणांतून ५६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती निश्चित झाल्या असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.

माघार घेतलेले प्रमुख उमेदवार

शिक्रापूर जिल्हा परिषद गटातून माजी सदस्य कुसुम आबाराजे मांढरे, भाजपाच्या कुसुम बाळासाहेब खैरे, न्हावरे जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या तृप्ती सरोदे यांनी माघार घेतली आहे.

तसेच पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे, माजी सदस्य राजेंद्र गदादे आणि घोडगंगा सहकारी संस्थेचे माजी संचालक सुधीर फराटे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार

1) कवठे यमाई गट

राजेंद्र पोपटराव गावडे (भाजपा)

दामू धोंडीबा घोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

सुभाष रामचंद्र पोकळे (शिवसेना शिंदे)

बाळासाहेब अंकुश डांगे (शिवसेना उद्धव ठाकरे)

2) न्हावरे गट

मालती बाबुराव पाचर्णे (भाजपा)

वृषाली बबन वाळके (राष्ट्रवादी काँग्रेस)

3) रांजणगाव गणपती गट

स्वाती दत्तात्रय पाचुंदकर (भाजपा)

ज्योती मानसिंग पाचुंदकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

4) पाबळ गट

विकास शिवाजीराव गायकवाड (भाजपा)

प्रफुल्ल काळुराम शिवले (राष्ट्रवादी काँग्रेस)

5) शिक्रापूर गट

मोनिका नवनाथ हरगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

सीमा त्रिनयन कळमकर (अपक्ष)

6) तळेगाव ढमढेरे गट

दिपाली राहुल गव्हाणे (भाजपा)

रेखा मंगलदास बांदल (राष्ट्रवादी काँग्रेस)

चेतना जयकुमार ढमढेरे (शिवसेना उद्धव ठाकरे)

सारिका राहुल करपे (शिवसेना शिंदे)

7) मांडवगण फराटा गट

सचिन बंडू शेलार (भाजपा)

सुजाता अशोकराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

दादासो गणपत फराटे (अपक्ष)

मच्छिंद्र शिवराम गदादे (शिवसेना उद्धव ठाकरे)

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930