नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिवसेनेच्या मुख्य सचिवांनी घेतली लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील उमेदवाराची भेट  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

शिवसेनेच्या मुख्य सचिवांनी घेतली लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील उमेदवाराची भेट 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी, शिवसेनेचे वरिष्ठ सचिव रामकाका रेपाळे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटास भेट दिली. यावेळी त्यांनी योगेश झुरुंगे यांच्या लोणीकंद येथील जनसंपर्क कार्यालयालाही सदिच्छा भेट दिली.

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाकडून योगेश झुरुंगे हे निवडणूक रिंगणात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर रामकाका रेपाळे यांनी गटातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत संवाद साधला. निवडणुकीसंदर्भात चर्चा करताना गटाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक तसेच वैयक्तिक जनहिताशी संबंधित नागरिकांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन रामकाका रेपाळे यांनी यावेळी दिले. तसेच येत्या काळात लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाचा विस्तार व बळकटीकरण करण्याचा निर्धार व्यक्त करत, उमेदवार योगेश झुरुंगे यांना पक्ष संपूर्ण ताकदीने पाठबळ देईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसेना पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्षाकडून मिळणाऱ्या या भक्कम पाठिंबा आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात आपण निश्चितपणे बाजी मारू, असा ठाम विश्वास उमेदवार योगेश झुरुंगे यांनी यावेळी व्यक्त केला. विकासाचा संकल्प घेऊन ही निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930