नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीचा रणसंग्राम;बाहेरगावच्या मतदारांचा कौल ठरणार निर्णायक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीचा रणसंग्राम;बाहेरगावच्या मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीमुळे राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून पंचायत समितीच्या सर्वच गणांमध्ये अटीतटीची, श्वास रोखून धरणारी रणधुमाळी सुरू आहे. या मतदार संघातील मोठ्या गावांमध्ये बाहेरगावाहून येऊन स्थायिक झालेल्या मतदारांचा टक्का ‘गेमचेंजर’ ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, मतदारांच्या कौलावर उमेदवारांचे राजकीय भवितव्य लटकले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचून आता कडेलोटाच्या क्षणावर आला आहे. सर्व प्रमुख उमेदवारांनी पूर्ण ताकद पणाला लावत प्रचारात झोकून दिले असून, मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. येत्या ७ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी आज रात्री प्रचाराची तोफ थंडावणार असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते प्रत्येक गाव, वाडी-वस्ती, सोसायटीत अक्षरशः पायाला भिंगरी लावून धावताना दिसत आहेत.

हात जोडून, शब्द देत, आश्वासनांचा पाऊस पाडत, विकासाची स्वप्ने दाखवत मतदारराजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अखेरचा आणि निर्णायक डाव टाकला जात आहे. वातावरण इतके तणावपूर्ण झाले आहे की एक-एक मत सोन्यासारखे मोलाचे ठरणार आहे.

सुज्ञ मतदार राजा आपले अमूल्य मतदान नेमके कोणाच्या झोळीत टाकणार? कोणाच्या गळ्यात विजयाचा गुलाल उडणार आणि कोणाचा चेहरा धुळीत जाणार? याचे उत्तर ९ तारखेला मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. सध्या तिन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये कमालीची चुरस, तीव्र राजकीय संघर्ष आणि शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम असून, बाजी कोण मारतो याकडे संपूर्ण लोणीकंद–पेरणे गटाचे लक्ष खिळून राहिले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930