नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण; ७१ टक्के मतदान – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण; ७१ टक्के मतदान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. लोणीकंद मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान सुरळीतपणे झाले. या केंद्रावर एकूण ७,३७२ मतदारांपैकी ५,२१३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण ७१ टक्के मतदान नोंदवले गेले.

या निवडणुकीत दिव्यांग बांधवांचा सक्रिय सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. तसेच १८ वर्षे पूर्ण केलेले नवमतदार, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.

मतदान प्रक्रियेत एका बॅलेटवर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार असल्यामुळे मतदारांना दोन मते द्यावी लागली. जिल्हा परिषद गटासाठी एक आणि पंचायत समिती गणासाठी एक, अशी दोन्ही मते दिल्यानंतरच ईव्हीएम मशिनवर बीपचा आवाज येत असल्याने मतदान यशस्वी झाल्याची खात्री मिळत होती.

एका बॅलेटवर उमेदवारांची नावे व त्यांची चिन्हे देण्यात आली होती. वरच्या बाजूस पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवर जिल्हा परिषदेचे उमेदवार तर त्याखाली गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर पंचायत समितीच्या उमेदवारांची नावे होती.

मतदान प्रक्रियेची गोपनीयता राखण्यासाठी मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मतदानाचा फोटो अथवा व्हिडिओ काढणे आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गुन्हा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते, जेणेकरून मतदार निर्भयपणे आणि स्वतंत्रपणे मतदान करू शकतील.

लोणीकंद मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.या केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली.संपूर्ण परिसरात पोलीस व निवडणूक प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930