नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बलिदान मास पाळत शंभूराजांना अभिवादन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

बलिदान मास पाळत शंभूराजांना अभिवादन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र तुळापूर, आणि शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वढू बुद्रुक तसेच पंचक्रोशीतील अनेक शंभू भक्तांनी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ बलिदान मास भक्तिभावाने पाळण्यास सुरुवात केली आहे. या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करून शंभूराजांच्या शौर्याला अभिवादन करण्यात येत आहे, औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘बलिदान दिवस’ किंवा ‘स्मरण दिन’ म्हणून पाळला जातो. स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस विशेष मानला जातो.

बलिदान मास या वर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा १८ फेब्रुवारी पासून सुरू होऊन १८ मार्च फाल्गुन (मृत्युंजय अमावस्या) पर्यंत पाळला जातो. या कालावधीत भक्तगणांकडून अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने विविध धार्मिक नियमांचे पालन केले जाते. मांसाहार पूर्णपणे बंद ठेवणे, पाया चप्पल न घालणे, तसेच गोड व तामसिक अन्नाचे सेवन टाळणे अशा संयमपूर्ण आचारांचे पालन केले जाते. प्रतिमेचे पूजन करून ध्येयमंत्र व प्रेरणास्त्रोत म्हणून शंभू महाराजांचे स्मरण केले जाते. राष्ट्रप्रेमी आणि व्यसनमुक्त समाज घडवणे हा बलिदान मासाचा मुख्य संदेश ठरत आहे.

शंभूराजांच्या धैर्य व बलिदानाचे स्मरण,तरुणांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करणे,राष्ट्रहित आणि समाजसेवेची प्रेरणा देणेपोवाडे, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इतिहास जागृती अभियान स्थानिक ग्रामस्थ आणि युवक मंडळांच्या पुढाकारातून गावोगावी शौर्यगाथा सांगणारे कार्यक्रम आयोजित केले जात असून युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली जात आहे. शंभू महाराजांना सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण केली जाते. भक्तगण सुतक पाळून साधे, संयमित व सात्त्विक जीवन जगतात. महिनाभर समाधी स्थळी दिव्यांची आरास करून भक्तिमय वातावरण निर्माण केले जाते.

बलिदान मास हा शंभूराजांनी सोसलेल्या अमानवीय छळाची आठवण करून देणारा आहे. स्वराज्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारा हा काळ असल्याचे भाविकांनी सांगितले.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930