नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या चंद्रशेखर खराबे यांचे गावात स्वागत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील चंद्रशेखर अशोक खराबे यांनी अत्यंत कठीण आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाणारी नर्मदा नदी परिक्रमा अवघ्या १०० दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण करून आज आपल्या गावी परतले. त्यांच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत करत दर्शन घेतले.
नर्मदा परिक्रमा ही भारतातील सर्वात कठीण धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. संपूर्ण परिक्रमे दरम्यान साधकांना कठोर नियम, संयम आणि शारीरिक-मानसिक सहनशक्तीची मोठी परीक्षा द्यावी लागते. चंद्रशेखर खराबे यांनी दृढ श्रद्धा, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही परिक्रमा निर्धारित कालावधीत पूर्ण करत गावाचे नाव उज्ज्वल केले.
गावी परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार, सत्कार आणि अभिनंदन करून स्वागत केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल जाणून घेत प्रेरणा घेतली. ग्रामस्थांनी चंद्रशेखर खराबे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत ईश्वरचरणी प्रार्थना केली की, त्यांना पुढील आयुष्यात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य लाभो. गावातील युवकांसाठी त्यांच्या या कार्यामुळे श्रद्धा, संयम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





