नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त तुळापूर व वढू बुद्रुक येथे भव्य रक्तदान शिबिरे उत्साहात संपन्न – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त तुळापूर व वढू बुद्रुक येथे भव्य रक्तदान शिबिरे उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तुळापूर व श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे रविवारी (दि.२२) आयोजित करण्यात आलेली भव्य रक्तदान शिबिरे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जिल्हा रुग्णालय औंध तसेच रेड प्लस ब्लड बँक, भोसरी यांचे सहकार्य लाभले. हजारो शंभू भक्तांनी रक्तदान करून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले. पुणे सर्जिकल इन्स्टिट्यूट, तर्पण ब्लड सेंटर व अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तब्बल ५२७१ शंभू भक्तांनी रक्तदान करत उल्लेखनीय प्रतिसाद नोंदविला. ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन्ही ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये सहभागी रक्तदात्यांना शंभूराजे प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रक्तदात्यांसाठी चहा-नाष्टा, पिण्याचे पाणी व थंड पेयांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या रक्तदान उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930