नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रशासनाच्या आश्वासनानंतर लोणीकंदमधील उपोषण मागे – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

प्रशासनाच्या आश्वासनानंतर लोणीकंदमधील उपोषण मागे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

प्रशासनाच्या आश्वासनानंतर लोणीकंदमधील उपोषण मागे, गतिरोधक बसविण्याचा निर्णय; नागरिकांच्या आंदोलनाला यश

लोणीकंद, प्रतिनिधी :

लोणीकंद हद्दीतील लोणीकंद–थेऊर अष्टविनायक मार्गावरील राजेश इस्ट इनिग्मा सोसायटी (सोनबा नगर) समोरील रस्त्यावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.

या संदर्भात नागरिकांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देत अनेक वेळा पाठपुरावा केला होता. अखेर उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आकांक्षा बन्सपाल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच गतीविरोधक बसविण्याबाबतचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगत लवकरच गतीविरोधक बसविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले.

आंदोलनादरम्यान लोणीकंदचे माजी सरपंच श्रीकांत कंद, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, राहुल शिंदे, श्रीकांत जगताप, जय कंद, सुनील कंद, संतोष झुरुंगे, अतुल मगर यांच्यासह अनेक नागरिकांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.

सदर परिसरात पेट्रोल पंप, गॅलक्सी इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच सोमवंशी अकॅडमी यांसारख्या शैक्षणिक संस्था असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक व नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रस्ता उताराचा असल्याने अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा गंभीर अपघात झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

सोसायटीचे चेअरमन रोहित कंद, गणेश सावंत, विठ्ठल शिंदे, प्रमोद शिंदे, दिपक गायकवाड, महेश दगडे, नाना कंद यांच्यासह सोसायटीतील महिला भगिनी, सदस्य व रहिवाशांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर आंदोलनाला यश मिळाले.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930