नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , महसूल विभागाची २३ खाण क्रशर धारकांवर कारवाई – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

महसूल विभागाची २३ खाण क्रशर धारकांवर कारवाई

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हवेली तालुक्यातील वाघोली व लोणीकंद खानपट्टा परिसरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या खाण क्रशरवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दि. २४ व २५ रोजी दोन दिवस चाललेल्या संयुक्त मोहिमेत विक्री परवाना नसलेल्या तब्बल २३ क्रशर धारकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असून हवेली तालुक्यातील खानपट्टा असलेल्या भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. महसूल विभाग, महावितरण आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने मंगळवार (दि.२४) पासून कडक कारवाईला सुरुवात केली.

अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विक्री परवाना न घेता सुरू असलेल्या २३ खाण क्रशरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षासाठी गौण खनिज उत्खननाकरिता देय असलेली स्वामीत्व धनाची रक्कम न भरलेल्या खाणींवरही प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी क्रशर मालक व खानपट्टा धारकांना नियमांचे पालन करण्याबाबत अनेकदा लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही विक्री परवाना न घेता तसेच स्वामीत्व धन न भरता व्यवसाय सुरू ठेवणारे आढळून आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.

या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या खाण क्रशर चालकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाचा इशारा स्पष्ट झाला आहे. पुढील काळातही अशाच प्रकारची तपासणी व कारवाई सुरू राहणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930