नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , खोडद येथे ‘जीएमआरटी’मध्ये २८वे विज्ञान प्रदर्शन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

खोडद येथे ‘जीएमआरटी’मध्ये २८वे विज्ञान प्रदर्शन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

खोडद (ता. जुन्नर) : खोडद येथील आशियातील ख्यातनाम रेडिओ दुर्बीण प्रकल्प Giant Metrewave Radio Telescope (जीएमआरटी) येथे जागतिक विज्ञान दिनानिमित्त २८वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ९.३० वाजता पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांच्या हस्ते होणार असून समारोप रविवारी दुपारी ३.३० वाजता पुणे कृषी महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारे हे प्रदर्शन विज्ञान प्रसारासाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे. यावर्षी अनेक नामवंत संस्था, शाळा तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग असून तब्बल २२ संशोधन संस्थांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे. विज्ञानप्रेमींसाठी ज्ञानाची अनोखी पर्वणी उपलब्ध झाली असून हे प्रदर्शन शनिवार, २८ फेब्रुवारी आणि रविवार, १ मार्च या दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.विज्ञानाची गोडी वाढवणारे हे प्रदर्शन मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनुभवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचा इतिहास, वैज्ञानिक संशोधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, तसेच हैदराबाद येथील बलून फॅसिलिटीमार्फत वैज्ञानिक बलून उड्डाण व प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विज्ञानाची आवड निर्माण करून नव्या पिढीला संशोधनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम विद्यार्थी, पालक आणि विज्ञानप्रेमींसाठी ज्ञानाची मेजवानी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930