नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदमध्ये तरुणांचा जल्लोष; धुलीवंदन सण उत्साहात साजरा – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदमध्ये तरुणांचा जल्लोष; धुलीवंदन सण उत्साहात साजरा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद (ता. हवेली) : रंगांचा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जाणारा होळी उत्सव लोणीकंद परिसरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सोमवार (दि. २) मार्च रोजी सायंकाळी नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने होळीचे दहन करत वाईट प्रवृत्तींचा प्रतीकात्मक अंत केला. गावातील विविध भागांत होळीभोवती महिलांनी ओवाळणी केली, तर युवकांनी पारंपरिक घोषणा देत वातावरण उत्साही केले.

दुसऱ्या दिवशी धुलिवंदनानिमित्त गावात रंगांची उधळण करण्यात आली. लोणीकंदचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कंद सुधाकर मोरे यांच्यासह विकास शिंदे, महेश चव्हाण, गणेश शिंदे, योगेश दळवी, पिंटू मगर, अक्षय सोनवणे, तेजस देशमुख, अजिंक्य शिंदे, अमर शिंदे, विजय कंद, किरण होले, भाऊसाहेब झुरुंगे, बंटीशेठ शिंदे, अमित झुरुंगे, निखिल दळवी या तरुणांनी एकमेकांना विविध रंग लावून होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात सणाचा उत्सव रंगला.

यंदा अनेक युवकांनी रासायनिक रंगांना नकार देत नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले. पाण्याची नासाडी टाळून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्यावर भर देण्यात आला. काही ठिकाणी ‘ड्राय होळी’ साजरी करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

एकूणच लोणीकंद परिसरात पारंपरिक उत्साह, सामाजिक ऐक्य आणि पर्यावरण जनजागृती यांचा संगम साधत होळी उत्सव आनंदात पार पडला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930