सचिन बेंडभर यांच्या समीक्षणात्मक ग्रंथाला कोल्हापूरचा पुरस्कार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरकडून विशेष गौरव
कोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या समग्र मराठी साहित्यकृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास या पुस्तकाला बालसंकीर्ण विभागात न्यू हायस्कूल नेवापुर व मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट साहित्य पुरस्कार ३१ व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष व शाहूवाडी येथील गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. विश्वास सुतार, पन्हाळा येथील नवशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गवंडी, कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील, स्वागताध्यक्ष एस. एस. माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे २०२५ या वर्षाचे साहित्य पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यात बालसंकीर्ण विभागात सचिन बेंडभर यांच्या समग्र मराठी साहित्यकृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास या समीक्षणात्मक ग्रंथाला उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पन्हाळा येथील गटशिक्षण अधिकारी शिवाजी मानकर, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, संचालक हंबीरराव कुऱ्हाडे, विजय पाटील, गिरीश कुराडे, अमरसिंह भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समग्र मराठी साहित्यकृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास हा समीक्षणात्मक ग्रंथ असून यात बेंडभर यांनी एकूण ७५ पुस्तकांचे परीक्षण केले आहे. या पुस्तकात प्रा. कुंडलिक कदम, मीनाक्षी पाटोळे, प्रा. अलका सपकाळ, मनोहर मोहरे, शेखर फराटे, विठ्ठल वळसे पाटील, तानाजी धरणे, सुजाता शिंदे, रवींद्र जवादे या नव्या पिढीतील लेखकांबरोबर प्रा.साईनाथ पाचारणे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड, आबा महाजन, गणेश भाकरे, संगीता बर्वे, कैलास दौंड, फारुक काझी, सुरेश सावंत, प्रशांत असणारे, डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. देवबा पाटील, संजय ऐलवाड, सुनिताराजे पवार आणि उत्तम सदाकाळ या नामवंत साहित्यिकांचाही समावेश आहे.
सचिन बेंडभर यांच्या समग्र मराठी साहित्यकृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास या समीक्षणात्मक ग्रंथाला हा पहिलाच पुरस्कार असून या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





