नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया कंद यांचा कट्टा मित्र परिवाराकडून सत्कार – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया कंद यांचा कट्टा मित्र परिवाराकडून सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

लोणीकंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया जय कंद यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कट्टा मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच लोणीकंद येथील राजेश सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल शिवाजी शिंदे यांचीही बिनविरोध निवड झाल्याने त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या निवडीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कट्टा मित्र परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कट्टा गॅंग मित्र परिवाराचे अध्यक्ष सचिन वाळुंज, खजिनदार विनय ढमढेरे, कार्याध्यक्ष विकास शिंदे, जय कंद, पोपट मांजरे, किरण शिंदे, स्वप्नील मगर, सुकदेव वाघमोडे, पिंटू मगर, गणेश जगताप, संदीप शिंदे, आशिष गायकवाड, महेश यादव, चेतन झगडे आदी उपस्थित होते.

लोणीकंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया कंद यांची निवड झाल्यामुळे गावातील विकासकामांना नवी गती मिळेल. तसेच राजेश सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल शिवाजी शिंदे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद गावाचा तसेच राजेश सोसायटीचा सर्वांगीण विकास होईल आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, अशा शुभेच्छा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गौरव झुरुंगे यांनी दिल्या.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930