नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाजेवाडी–मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्वेता मांजरे  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

वाजेवाडी–मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्वेता मांजरे 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाजेवाडी–मांजरेवाडी (ता. शिरूर,) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी विशेष सभा सोमवार (दि. १६) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पूनम ज्ञानेश्वर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत श्वेता भानुदास मांजरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उपसरपंच यशोदा गणेश सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. उपसरपंच पदासाठी श्वेता मांजरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच पूनम चौधरी यांनी केली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस अमित सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य रामदास मांजरे, संदीप भोर, सुरज तिखे, सुरेखा मांजरे, मंगल तिखे, तसेच चंद्रकांत धनवडे, गणेश सोनवणे  धर्मराज मांजरे, कानिफनाथ मांजरे, शामराव तिखे, जयसिंग तिखे, आनंद भोर, प्रवीण भोर, किरण पावशे, सागर सोनवणे, भानुदास मांजरे, ग्रामविकास अधिकारी मंगल लगड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्वेता मांजरे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्वेता मांजरे या गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून गावाच्या विकासासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे भाजपा सरसिटणीस अमित सोनवणे यांनी यावेळी सांगितले.

नवनिर्वाचित उपसरपंच श्वेता मांजरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वीज, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा तसेच महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930