नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तळेगाव ढमढेरे येथे ‘उमेद’ अभियानाची पाहणी; महिला उद्योगांचे कौतुक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

तळेगाव ढमढेरे येथे ‘उमेद’ अभियानाची पाहणी; महिला उद्योगांचे कौतुक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत महिला बचत गटातून सुरू झालेल्या विविध उद्योग व्यवसायांची पाहणी करण्यासाठी अभियानाच्या राज्यस्तरीय टीमने गाव भेट दौरा केला.

या दौऱ्यात संस्कृती गृह उद्योग समूहाच्या संचालिका कविता दत्तात्रय बोडके यांना विशेष भेट देण्यात आली. मान्यवरांनी उद्योगाच्या कार्यपद्धतीची सविस्तर पाहणी करून विविध उत्पादनांची चव घेत गुणवत्ता तपासली.

भेटीदरम्यान तज्ञांनी महिलांना व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विशेषतः स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत, निर्यातक्षम उत्पादनांसाठी उच्च दर्जाची स्वच्छता राखणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तसेच अन्न परवाना घेऊन उत्पादनांचे नमुने तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला. भविष्यात भांडवल उभारणीसाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध होऊ शकते, अशी माहितीही देण्यात आली.

याचवेळी पुण्यश्री सुपरमार्केट, इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुविधा केंद्राच्या संचालिका जयश्री गणेश जगताप तसेच जेधे डेअरी फार्म संचालिका रूपाली जेधे यांच्या उद्योगांचाही आढावा घेण्यात आला. महिला बचत गटातून मिळालेला निधी व बँक कर्जाच्या सहाय्याने या उद्योगांनी साधलेली प्रगती आणि वार्षिक उलाढाल पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

या दौऱ्यात डिस्ट्रीब्यूशन विभागाचे विजयन केशवन, डीजीएम रवींद्र कुमार, पुणे विभागाचे प्रादेशिक प्रमुख राजेंद्र आघव, वरिष्ठ व्यवस्थापक परमेश्वर क्षीरसागर, सहाय्यक महासंचालक मिथिलेश कुमार मंडल, सहाय्यक लेखा अधिकारी अजय सिंग तसेच मार्केटिंग निरीक्षक बलिंदर कुमार उपस्थित होते.

तसेच राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाचे टीम प्रमुख धुमाळ सर, टेक्निकल एक्सपर्ट विचारे सर, जिल्हा व्यवस्थापक सोनाली अवचट, तालुका व्यवस्थापक शिल्पा ब्राह्मणे, क्लस्टर कोऑर्डिनेटर अनिल नरके तसेच ग्रामसखी सुवर्णा जगताप, स्नेहल नरके आणि जयश्री जगताप यांनीही सहभाग नोंदविला.

मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करत, या उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक महिलांना रोजगारनिर्मिती होत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळत असल्याचे नमूद केले. पुढील वाटचालीसाठीही त्यांनी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930