नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हवालदार अमोल ढोणे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

हवालदार अमोल ढोणे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार अमोल ढोणे यांचासह अठ्ठावीस पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

खराडी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या NDPS गुन्ह्याच्या तपासात हवालदार ढोणे यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणात त्यांनी पुण्यासह राजस्थान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कारवाई केली. या धाडसी मोहिमेदरम्यान अमली पदार्थ, महागड्या गाड्या, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण सुमारे ४ कोटी ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच या प्रकरणात राज्य व परराज्यातील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हवालदार अमोल ढोणे यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.

या कारवाईमुळे अमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, पोलीस दलात ढोणे यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930