डॉ. किरण चव्हाण राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार यावर्षी पुणे येथील डॉ. किरण चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यसनाधीनतेत अडकलेल्या नागरिकांना व्यसनमुक्त करून त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी कार्यरत संस्था व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. गेली पंधरा वर्षे डॉ. किरण चव्हाण यांनी व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य क्षेत्रात सातत्याने आणि जिद्दीने कार्य करत हजारो व्यक्तींना नवजीवन दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना सन्मानित केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार रामदास आठवले, राहुल नार्वेकर, संजय शिरसाट, माधुरी मिसाळ, अरविंद सावंत तसेच समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. किरण चव्हाण यांच्या कार्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना नवे आयुष्य मिळत असून त्यांच्या कुटुंबात पुन्हा आनंद निर्माण होत आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मिळालेला हा पुरस्कार व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





