शेतकरी पुत्र झाला पोलीस उपनिरीक्षक
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
किरण धनावडे यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले – विनायक पवार
लोणीकंद, प्रतिनिधी:
भोर तालुक्यातील पानव्हळ येथील प्रगतशील शेतकरी सुरेश धनावडे यांचे सुपुत्र किरण धनावडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळविले आहे. त्यांनी राज्यात ८४ वा क्रमांक मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
किरण धनावडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खडतर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले असल्याचे विनायक पवार यांनी सांगितले. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओम साई फाउंडेशन, भोर यांच्या वतीने किरण धनावडे यांचा सन्मानचिन्ह व अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच ओम साई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विनायक संपत पवार यांच्यासह ग्रामस्थांनी किरण यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. किरण धनावडे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





