उपविभागीय अधिकारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे, दि. २७ मार्च २०२६ — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे पथकाने जुन्नर-आंबेगाव येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी इमारतीच्या अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी उपविभागीय कार्यालय, मंचर येथे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने सुरुवातीला पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने ACB पुणे येथे तक्रार दाखल केली.
ACB ने पडताळणी केली असता आरोपीने दोन लाख रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २७ मार्च रोजी सापळा रचण्यात आला. मंचर येथील कार्यालयात दुपारी तक्रारदाराकडून दोन लाख रुपये घेताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





