नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी विजेता दिग्विजय भोंडवे याचा लोणीकंदमध्ये सत्कार – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी विजेता दिग्विजय भोंडवे याचा लोणीकंदमध्ये सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद : कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या दुसऱ्या ग्रीकोरोमन वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या दिग्विजय भोंडवे याने बुलढाण्याच्या अक्षय शेळकेवर मात करत मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल दिग्विजय भोंडवे याचा लोणीकंद ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दिग्विजय भोंडवे हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहिलवान संदीप भोंडवे यांचा सुपुत्र असून त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

लोणीकंद ग्रामपंचायतीचे सदस्य ओंकार कंद, हनुमंत कंद, निळोबा कंद तसेच ग्रामस्थांच्या वतीने दिग्विजय भोंडवे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला. दिग्विजय भोंडवेच्या या यशामुळे लोणीकंद परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930