नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद येथे शिधापत्रिका समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद येथे शिधापत्रिका समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद (ता. हवेली) : महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत महसूल विभागाद्वारे शिधापत्रिका संबंधी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शुक्रवार, दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी कै. विद्याधर बाबुराव कंद सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, लोणीकंद येथे पार पडले.

महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य आणि ग्रामपंचायत लोणीकंद व ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात नागरिकांच्या शिधापत्रिका संदर्भातील विविध अडचणींवर एकाच ठिकाणी मार्गदर्शन व तत्काळ निपटारा करण्यात आला. शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसणे, नावातील चुका, नाव कमी-जास्त करणे, दुबार शिधापत्रिका मिळवणे, संगणकीकरण आदी बाबींसाठी शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

शिबिरामध्ये दुबार शिधापत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, नाव वाढवणे किंवा कमी करण्यासाठी लागणारी प्रक्रिया, तसेच संगणकीकृत शिधापत्रिका तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये आधारकार्ड, रहिवास पुरावा, उत्पन्न दाखला, बँक पासबुक, गॅस पुस्तक आदी कागदपत्रांची तपासणी करून अर्ज स्वीकृत करण्यात आले.

या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही. सर्व सेवा एकाच दिवशी व एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत लोणीकंद यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला असून, शासनाच्या लोकाभिमुख धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930