नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कारच्या धडकेत ८ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

कारच्या धडकेत ८ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पार्किंगमध्ये झोपलेल्या ८ वर्षीय चिमुरडीच्या डोक्यावर कारचे चाक गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि. ३ एप्रिल २०२६) रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास रामनगर, वढू खुर्द येथे घडली असून मैराबी रसुलसाब बळीगर (वय ८) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक भरत रमेश नेहेते (वय ४६, रा. रामनगर वढू खुर्द) हा त्याच्या ताब्यातील MH-12-NE-6427 क्रमांकाची Mahindra XUV500 ही कार निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी पार्किंगमध्ये झोपलेल्या मैराबीच्या डोक्यावरून कारचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी लालासाब महंमदसाब कालेगार (वय ३९, रा. सोमेश्वर पार्क, लोणीकंद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात चालक भरत रमेश नेहेते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे करीत आहेत.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930