“ओन्ली किंग ऑफ पुणे” म्हणत रॅली; तडीपार आरोपींची पोलिसांनी काढली मस्ती
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे, खराडी : सोशल मीडियावर दहशत माजवण्याच्या उद्देशाने रॅली काढून रिल्स बनवणाऱ्या तडीपार आरोपींची खराडी पोलिसांनी चांगलीच ‘जिरवली’. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांनी ठोस संदेश दिला असून गुन्हेगारीला कोणताही थारा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर (येरवडा) येथील सराईत गुन्हेगार निखील मधुकर कांबळे (वय २३) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने आदेशाचे उल्लंघन करत २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान खराडीतील रक्षक नगर गोल्ड सोसायटी परिसरात आपल्या साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवला.यावेळी “ओन्ली किंग ऑफ पुणे” असे म्हणत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच nk-company-munjabawasti-pune-15 या इंस्टाग्राम आयडीवरून संबंधित व्हिडिओ रिल्सद्वारे प्रसारित करण्यात आले.
या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १८९ (१)(२), १९० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१)(३), १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी निखील कांबळे याच्यासह सुरेश रुपेश गायकवाड (२३), अनुज नितीन मोरे (२२) आणि ओमकार अनिल चावरे (२४) यांना अटक केली आहे. तसेच अन्य ८ ते १० अनोळखी साथीदारांचा शोध सुरू आहे.विशेष म्हणजे, अटक केलेल्या आरोपींना त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवलेल्या ठिकाणी नेऊन स्थानिक नागरिकांसमोर फेरी काढण्यात आली. यामुळे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना चाप बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





