नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे आयोजन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे आयोजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विषयक दैनंदिन अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी लोणीकंद येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.

या शिबिरासाठी पुणे जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, पंचायत समिती सदस्य मोनिका कंद, राणी वाळके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने तसेच अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती लोणीकंद ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या शिबिरात नागरिकांना देण्यात येणाऱ्या महसूल विभागामार्फत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित १५ पेक्षा अधिक सेवा शिबिरस्थळीच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र तसेच अकृषिक परवानगी संदर्भात मार्गदर्शन,याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्जाची माहिती, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तसेच भूसंपादन व अकृषिक प्रकरणांसाठी आवश्यक ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याचे कामही या शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिराचा लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील दहा गावातील ग्रामस्थ नागरिकांना लाभ होणार असून नागरिकांनी आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची छायांकित प्रती सोबत घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930