नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ड्रायव्हरच्या मुलागा झाला कर सहाय्यक अधिकारी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

ड्रायव्हरच्या मुलागा झाला कर सहाय्यक अधिकारी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण लोणीकंद येथील विशाल राजेश आदाणे यांनी दाखवून दिले आहे. खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा आज एमपीएससी परीक्षेत यश मिळवत कर सहाय्यक  अधिकारी पदावर पोहोचला आहे.

गेल्या वीस वर्षांपासून लोणीकंद गावात वास्तव्यास असलेले राजेश सुकदेव आदाणे हे मूळचे विरमगाव (ता. फुलताबाद, जि. संभाजीनगर) येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. उदरनिर्वाहासाठी ते पुण्यात खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करतात. मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी सातत्याने मेहनत घेतली.

विशाल आदाणे यांनी प्राथमिक शिक्षण लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेत (इयत्ता १ ते ७) पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण चंदननगर येथील सुंदराबाई मराठे विद्यालयात (इयत्ता ८ ते १०) घेतले. पुढे लोणीकंद येथील रामचंद्र कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. तसेच नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एमपीएससीची तयारी सुरू केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ (जाहिरात क्र. ११८/२०२५) अंतर्गत कर सहाय्यक (Tax Assistant) पदाच्या कौशल्य चाचणीसाठी विशाल आदाणे पात्र ठरले आहेत. या यशामुळे त्यांची पुढील निवड प्रक्रिया निश्चित झाली आहे.

साध्या कुटुंबातून आलेल्या विशाल यांच्या या यशामुळे लोणीकंद परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930