नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान २०२६ अंतर्गत सोमवार (दि. १३) रोजी लोणीकंद येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विषयक तक्रारी तत्काळ निकाली काढण्याच्या उद्देशाने हे शिबिर भाजपा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे,पंचायत समिती सभापती युवराज काकडे, पंचायत समिती सदस्य मोनिका कंद,राणी वाळके, तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिबिरामध्ये विविध महसूल व सामाजिक योजनांचा लाभ एकूण ३२३९ नागरिकांना देण्यात आला. यामध्ये ‘जिवंत ७/१२’ मोहिमेअंतर्गत फेरफार, वारस नोंदी, ७/१२ व ८अ वाटप, उत्पन्न व रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्रे आदींचे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहाय्य देण्यात आले.

याशिवाय अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कद्वारे ७/१२ वरील चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकृत करण्यात आले. भूसंपादन व अकृषिक प्रकरणांवरील पत्रके तयार करण्यात आली. पुरवठा विभागामार्फत नवीन व दुरुस्ती शिधापत्रिका अर्ज स्वीकृती करण्यात आली.

लोणीकंद मंडळातील पाणंद व शिवरस्ते खुले करण्यात आले असून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच दिव्यांग लाभ योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य देखील वितरित करण्यात आले.

यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक प्रशासन राबवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत या अभियानाची अंमलबजावणी केली जात असून राज्यभरात लाखो नागरिकांना विविध महसुली सेवांचा लाभ देण्यात आला आहे.

तसेच महसूल विभागाचे बळकटीकरण, डिजिटल सेवा, शेतजमिनीच्या प्रक्रियांचे सुलभीकरण, ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता’ योजना, स्वामित्व योजना, ड्रोन सर्वेक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात महसूल विभागाच्या आकृतिबंधास मंजुरी दिल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महसुली सेवांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांनी माहिती घेतली व पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरित केले.

या शिबिरामुळे नागरिकांच्या प्रलंबित महसूल कामांना गती मिळाली असून शासनाचे प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930