कोरेगाव भीमा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कोरेगाव भीमा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कोरेगाव भीमा येथील संवाद पुनर्वसन केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचा महासंचालक पदक प्राप्त निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास तुळशीराम सोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पवन सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्रातील कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
संवाद पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गदर्शन करत समाजात समता, बंधुता व न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन हेमंत कुमार मुळे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





