नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद पोलीसांची धडाकेबाज कारवाई : अवैध हातभट्टी उध्वस्त, आरोपी जेरबंद – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद पोलीसांची धडाकेबाज कारवाई : अवैध हातभट्टी उध्वस्त, आरोपी जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

अवैध गावठी दारू निर्मितीवर लगाम घालण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत हिंगणगाव परिसरातील हातभट्टी उध्वस्त केली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ‘फ्लश आऊट’ मोहिम राबवित अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत दि. १३ एप्रिल २०२६ रोजी पोलीस पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. हिंगणगाव येथील एका शेताच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात गावठी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल साठवून रात्री उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्री सुमारे दहा वाजता छापा टाकला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेला आरोपी सचिन मकनसिंग नानावत (वय २७, रा. आष्टापुर फाटा, पुणे) हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी पाठलाग करून त्यास जेरबंद केले.

छाप्यात पोलीसांना सुमारे १३ हजार ५०० लिटर कच्चे रसायन व ६ हजार ७०० लिटर तयार गावठी दारू असा मोठा साठा आढळून आला. तसेच हातभट्टीसाठी लागणारी भांडी, प्लॅस्टिक टाक्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण १३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार कैलास साळुंके, सागर जगताप, संतोष अंदुरे, मल्हारी सपूरें, शुभम चिनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड व महिला पोलीस अंमलदार उज्वला काळाणे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करीत आहेत.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930