नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , धुळीच्या त्रासाने लोणीकंद ग्रामस्थ त्रस्त; माजी सरपंचांकडून महसूल मंत्र्यांना निवेदन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

धुळीच्या त्रासाने लोणीकंद ग्रामस्थ त्रस्त; माजी सरपंचांकडून महसूल मंत्र्यांना निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद गावात सुरू असलेल्या दगड खाणी, क्रेशर, तसेच गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून पासून होणाऱ्या धुळीच्या समस्येमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी सरपंच, विद्यमान सदस्य प्रियंका योगेश झुरुंगे यांनी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना श्वसनाचे विकार, अ‍ॅलर्जी व इतर आरोग्य समस्या उद्भवत आहेत. रोजच्या जीवनात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून ही समस्या सध्या गावातील सर्वात गंभीर प्रश्न ठरली आहे.

झुरुंगे यांनी मंत्र्यांना विनंती केली आहे की, या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देऊन लोणीकंद गाव धुळमुक्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. रस्त्यांवर पाणी फवारणी, डांबरीकरण तसेच धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाय त्वरित राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या निवेदनामुळे प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930