नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद : थेऊर रस्त्यावर हाय टेन्शन केबलला आग; ग्रामस्थांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद : थेऊर रस्त्यावर हाय टेन्शन केबलला आग; ग्रामस्थांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद परिसरातील थेऊर रस्त्यालगत उघड्यावर टाकण्यात आलेल्या हाय टेन्शन वीजवाहिन्यांच्या केबलला सोमवारी (दि. २०) रात्री अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत मोठा अनर्थ होण्याची शक्यता असताना, स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पाण्याचा टँकर बोलावून आग आटोक्यात आणली. याबाबतची माहिती माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी चार ते पाच हाय टेन्शन लाईन्स उघड्यावरच टाकण्यात आल्या आहेत. या केबल्स थेट जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला अत्यंत धोकादायक अवस्थेत पडलेल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी कोणतेही कुंपण, इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ही परिस्थिती लहान मुले, पादचारी तसेच वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, विजेचा धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आग लागल्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. “या केबल्स तातडीने सुरक्षितपणे जमिनीत गाडाव्यात किंवा योग्य संरक्षक उपाययोजना कराव्यात. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक प्रशासन आणि वीज वितरण विभागाने या गंभीर प्रकाराकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930