लोणीकंदच्या सुपुत्र अर्जुन कंद यांना भारतीय सैन्यात सुभेदार पदाची बढती
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद (ता. हवेली) : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद गावचे सुपुत्र अर्जुन संभाजी कंद यांना भारतीय सैन्यात सुभेदार पदावर बढती मिळाल्याने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्जुन कंद हे सन २००४ साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांनी आर्मी मेडिकल कोरमध्ये सैनिक म्हणून सेवा सुरू केली होती. आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यामुळे त्यांनी सैन्यात विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना सुभेदार पदावर बढती देण्यात आली आहे.
सध्या ते भारतीय सैन्यात कार्यरत असून देशसेवेचे कार्य अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि हवेली पंचायत समिती सदस्य मोनिका कंद तसेच सरपंच सुप्रिया कंद यांच्यासह लोणीकंद ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रमंडळींकडून दूरध्वनीद्वारे अर्जुन कंद यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
अर्जुन कंद यांच्या या यशामुळे लोणीकंद गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. विशेष म्हणजे, अर्जुन कंद यांचे चुलते धनाजी कंद व शांताराम कंद माजी सैनिक असून त्यांनीही देशसेवा बजावली आहे. त्यामुळे कंद कुटुंबाची देशसेवेची परंपरा आजही अभिमानाने पुढे चालू असल्याचे दिसून येते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





