नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिरूर पश्चिम मंडलच्या प्रभारी अध्यक्षपदी ॲड. सुधीर ढमढेरे यांची नियुक्ती – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

शिरूर पश्चिम मंडलच्या प्रभारी अध्यक्षपदी ॲड. सुधीर ढमढेरे यांची नियुक्ती

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टी शिरूर पश्चिम मंडलच्या प्रभारी अध्यक्षपदी ॲड. सुधीर ढमढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली.

यावेळी ॲड. ढमढेरे यांचे कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर भूमकर, संदीप सातव, राहुल गव्हाणे, हनुमंत कंद आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीमुळे पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी नवे नेतृत्व पुढे आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडी प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच भाजपा पुणे जिल्हा उत्तरचे अध्यक्ष प्रदीप कंद  यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी आणि स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करणार असल्याचे नवनिर्वाचित शिरूर पश्चिम मंडल अध्यक्ष ॲड. सुधीर ढमढेरे यांनी ‘लोणीकंद टाईम्स’ शी बोलताना सांगितले.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930