नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे: अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; १९ आरोपी जेरबंद – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पुणे: अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; १९ आरोपी जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे पोलीस यांच्या परिमंडळ ७ अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले असून एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आली.

पोलीसांनी वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ, चंदननगर आणि खराडी परिसरात छापे टाकून मेफेड्रॉन (एम.डी) आणि गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत १३ गुन्हे दाखल केले. प्राथमिक कारवाईत १३ आरोपींना अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान आरोपींनी राजस्थान येथून एम.डी. आणल्याची कबुली दिल्यानंतर विशेष पथक तयार करून राजस्थानमध्ये धाड टाकण्यात आली. या कारवाईत आणखी ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले, त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या १९ वर पोहोचली.

या मोहिमेत पोलिसांनी सुमारे ५८ लाख १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये: २८९.१९ ग्रॅम एम.डी.४२२ ग्रॅम गांजा २६० ग्रॅम एम.डी. अंश असलेली पावडर यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.तपास पुढे सुरू असून, आणखी मोठे जाळे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930