नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान यशस्वी; १०९ ग्रामस्थांची तपासणी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान यशस्वी; १०९ ग्रामस्थांची तपासणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद (ता. हवेली) : ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत लोणीकंद येथे आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात गावातील १०९ नागरिकांनी सहभाग घेत तीन प्रकारच्या कर्करोगांसह विविध असंसर्गजन्य आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली.

या उपक्रमात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, पंचायत समिती सदस्य मोनिका कंद, सरपंच सुप्रिया कंद, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिबिरामध्ये कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात येऊन त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच विविध रक्त तपासण्या व प्राथमिक तपासणी यावर विशेष भर देण्यात आला. महिला व पुरुषांची स्वतंत्र तपासणी करण्यात आली. तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.

पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. सारिका तायवडे, तसेच लोणीकंद येथील समुदाय आरोग्य अधिकारी शैला फड, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी आरोग्य पथकाकडून नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. सकाळपासूनच ग्रामस्थांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे संपूर्ण उपक्रम यशस्वी ठरला. या अभियानामुळे गावात आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930