जिल्हा परिषद पुणे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज जिल्हा परिषद पुणे येथे माननीय अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती दिपाली हुलावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता पाटील, समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अमोल नलावडे, जिल्हा परिषद सदस्य तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित सेवा, पारदर्शक प्रशासन आणि ग्रामविकासाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





