नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या ६ आरोपींना जेरबंद, ४१.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या ६ आरोपींना जेरबंद, ४१.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद : पुणे शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून लोणीकंद पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी) पावडरची विक्री करणाऱ्या एकूण ६ आरोपींना अटक करत ४१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग कारवाया करत आरोपींना जेरबंद केले.

दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कटकेवाडी फाटा, लोणीकंद येथे पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४०) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून २१.८६० ग्रॅम एमडी ड्रग्ज, आयफोन मोबाईल असा एकूण ४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर दि. २० एप्रिल रोजी पेरणे फाटा येथे राजेंद्र केरू टेळे (वय ३५) व करण सचिन मोहिते (वय २१) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ५९.१६० ग्रॅम एमडी ड्रग्ज, कार, मोबाईल फोन व रोख रक्कम असा १४ लाख १० हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपासात दि. २२ एप्रिल रोजी मगर वस्ती, लोणीकंद येथून भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८) व आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २१.४३० ग्रॅम एमडी ड्रग्ज, कार, मोबाईल व रोख रक्कम असा ८ लाख ३४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तसेच दि. २३ एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यातील योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७२.५०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, किंमत १४ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले.

या सलग कारवायांमध्ये एकूण ६ आरोपींना अटक करून १७४.९५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्जसह कार, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ४१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930