नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , क्षेत्र थेऊर येथील समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दीड हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

क्षेत्र थेऊर येथील समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दीड हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर, दि. ३: महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊरफाटा- थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅक्वेट हॉल येथे आयोजित शिबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये १ हजार ७०६ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, अतिरिक्त गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जि. प. सदस्या शितल सुजित कांबळे, सुरेखा रमेश हरगुडे, संदेश आव्हाळे, दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती उपसभापती विद्याताई गायकवाड, सदस्य कुशाल सातव, कृषिराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, कोमल गणेश कांबळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके यांच्यासह महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

यामध्ये उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंद, ई-मोजणी, तुकडेबंदी नियमितीकरण, पीएम किसान, नमो किसान सन्मान निधी, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत करसंबंधित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. विविध प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला. तसेच काही लाभार्थीना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली जलदगतीने सोडविणे शक्य झाले तसेच सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रलंबित प्रश्न गतीने मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

थेऊर, कोलवडी, साष्टटे, कुंजीरवाडी आणि मांजरी बुद्रुक या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण, वन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930