नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद हद्दीत महामार्गावर स्ट्रीट लाईटची तीव्र गरज – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद हद्दीत महामार्गावर स्ट्रीट लाईटची तीव्र गरज

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद :पुणे अहिल्यानगर महामार्गावरील  लोणीकंद ग्रामपंचायत हद्दीत, रस्त्यावर  सध्या फक्त सुमारे तीनशे मीटर परिसरात म्हणजे म्हसोबा मंदिर ते काळुबाई मंदिर या दरम्यानच स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध असून उर्वरित परिसर अंधारात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लोणीकंद पोलीस स्टेशन ते सुरवी चौक (जगताप डेअरी) आणि तेथून पुढे कटकेवाडी फाटा या मार्गावर तातडीने स्ट्रीट लाईट बसवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच पादचारी प्रवास करत असतात. मात्र अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे आणि रात्री वाढणाऱ्या धुळीच्या प्रमाणामुळे दृष्यमानता कमी होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मागील आठवड्यात लोणीकंद येथील म्हसोबा मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास एक वृद्ध महिला पायी रस्ता ओलांडत असताना टेम्पोच्या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि विठाई पेट्रोल पंपा जवळही एका व्यक्तीचा रात्रीच्या सुमारास कारचा धडकत मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लोणीकंद पोलीस स्टेशन ते कटकेवाडी फाटा या संपूर्ण मार्गावर स्ट्रीट लाईट बसवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930