नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हवेली पंचायत समितीत, मदतनीस ते सेविका पदोन्नतीने नियुक्ती झालेल्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान. – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

हवेली पंचायत समितीत, मदतनीस ते सेविका पदोन्नतीने नियुक्ती झालेल्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे:- एकात्मिक बालविकास सेवा योजना, पंचायत समिती हवेली यांच्या वतीने अंगणवाडी मदतनीस पदावरून ‘अंगणवाडी सेविका’ पदी नियुक्ती मिळालेल्या भगिनींचे विशेष अभिनंदन व सन्मानपत्र वितरण उत्साहात पार पडले. पंचायत समिती हवेलीचे सभापती श्री. युवराज काकडे यांच्या शुभहस्ते नियुक्ती झालेल्या सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी हवेली विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निलम भुमकर, उरुळीकांचन विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षय नजन, हवेलीच्या सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी स्वाती पाठक, पर्यवेक्षिका मीरा टेकवडे, पर्यवेक्षिका रुपाली जगताप, कनिष्ठ सहाय्यक लालपोतू मॅडम, थेऊरचे माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ कोळेकर, दत्तात्रय कोळेकर व सर्व पदोन्नती झालेल्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

हवेली तालुक्यात कार्यरत अंगणवाडी मदतनीस पैकी 12 वी पास शैक्षणिक अहर्ता अट व 2 वर्ष अनुभव असणाऱ्या, शासन निर्णयानुसार पात्र एकूण 7 अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना सभापती श्री. युवराज काकडे म्हणाले की, अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करताना या भगिनींनी अतिशय मेहनतीने आणि निष्ठेने योगदान दिले आहे. भविष्यात बालकांचा विकास आणि रचनात्मक समाज निर्मितीच्या कार्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरेल. सेविका पदाची जबाबदारी मोठी असून, तांत्रिक व बौद्धिक क्षमतेचा वापर करून या भगिनी उत्कृष्ट कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पुढील काळात अंगणवाडीत शिकणाऱ्या सर्व लहान बालकांना, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे काकडे यांनी नमूद केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031