नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाघोलीतील स्पा सेंटरवर छापा; ५ महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

वाघोलीतील स्पा सेंटरवर छापा; ५ महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाघोली : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी वाघोली परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसायातून ५ महिलांची सुटका केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २२ मे २०२६ रोजी बकोरी फाटा, वाघोली येथील रेम्बो क्रॉसेस बिल्डिंगमधील “9 सेन्सेस स्पा ” येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची पडताळणी केली. त्यानंतर स्पा सेंटरवर अचानक छापा टाकण्यात आला.

या कारवाईत स्पा सेंटरमध्ये आणलेल्या ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच महावीर सुदाम ससाणे (वय २९, रा. साईनाथनगर, पेरणे फाटा, ता. हवेली) याला अटक करण्यात आली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन व सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031